breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तसाहेब… मुख्य सुत्रधाराला अटक कधी करणार – हर्षदा सानेंचा सवाल

  • दत्ता सानेंच्या कार्यालयावरील हल्ल्यातील फरार आरोपींना अटक न केल्याने राष्ट्रवादीचा मोर्चा
  • अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांना आठ दिवसाचा अल्टीमेटम

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महानगरपालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयावरील झालेल्या भ्याड हल्ल्यातील मुख्य मास्टर माईंड अद्याप फरार आहे. त्या आरोपींना अटक करा, म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आज (मंगळवार) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी गोरगरीब जनतेची कामे करताना माझ्या पतीच्या कार्यालयावर भ्याड हल्ला झाला. सुदैवाने माझे पती त्यातून बचावले. परंतू, भ्याड हल्ला करणारे मास्टर माईंड मोकाट फिरत आहेत. त्यांना आयुक्तसाहेब… तुम्ही कधी अटक करणार, असा सवाल हर्षदा साने यांनी उपस्थित करताना त्यांना गहिवरुन आले होते.

या आंदोलनात माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका शमीम पठाण, नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, डब्बू आसवानी, पंकज भालेकर, मयुर कलाटे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

काकांना न्याय मिळालाच पाहिजे, काकांना संरक्षण मिळाले पाहिजे,  हल्ला करणा-या आरोपींना अटक झाली पाहिजे, मुलींवरील अत्याचार थांबला पाहिजे, अशा घोषणा देत महिलांनी पोलिस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या भ्याड हल्ले होवू लागले आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. जनतेची कामे करताना अनेकांचा रोष पत्करावा लागतो. त्यानंतर लोकप्रतिनिधी भ्याड हल्ले करुन दहशत पसरविण्याचा प्रकार सुरु आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित न ठेवल्यास यापुढे मुख्यमंत्री व गृहमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढू असा इशारा यावेळी दिला.

याप्रसंगी प्रशांत शितोळे, माजी आमदार विलास लांडे, शमीम पठाण, वैशाली काळभोर यांनी पोलिसांना खडे बोल सुनावत भ्याड हल्ला करणा-या आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिला. तसेच लोकप्रतिनिधीवरील हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. भ्याड हल्ल्यातील आरोपीकडून दत्ता साने यांच्या जिवितास धोका आहे. या घटनेमागील मास्टर माईंड तत्काळ शोधावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात मुख्य आरोपीही अटक करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर येत्या पाच ते सहा दिवसात सर्व आरोप अटक करण्यात येतील, असा आश्वासन अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शिष्टमंडळाला दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button