breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक एकवटले

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक एकवटल्याचे पहायला मिळाले. तसेच वाढदिनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. वाढदिवसाचा मुहूर्त साधून इरफान सय्यद यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा यानिमित्ताने मतदार संघात रंगली आहे. त्यातच त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
इरफान सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम, मोफत छत्री वाटप, खेड येथील चारा छावणीला चारा वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या स्नेहवन या संस्थेस आर्थिक स्वरूपाची मदत, बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप असे विविध कार्यक्रम शिवसंकल्प लोकहिताचा…अभिष्टचिंतन सोहळा इरफानभाईंचा या बैनरखाली घेण्यात आले. संपूर्ण मतदार संघात करण्यात आलेली फ्लेक्सबाजी, वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे जंगी आयोजन कार्यक्रमाच्या ठिकाणी साकारलेला भोसरीचा गड यातून त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन दिसून आले.
त्यांनी कापलेला केक चर्चेचा विषय ठरला. भोसरी विधानसभा मतदार संघाच्या नकाशाचा केक यावेळी कापण्यात आला. मोठ्या संखेने यूवकांचा व शिवसेना पदाधिकारी व  शिवसैनिकांचा कार्यक्रमांमधील सहभाग उल्लेखनीय ठरला.  याप्रसंगी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, जिल्हाप्रमुख राम गावडे, शिरुर लोकसभा महिला संघटिका सुलभा उबाळे,राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण सदाशिव खाडे, महापालिका स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, अभी इम्पेक्ट लॉजिस्टिकचे जितेंद्र जोशी,प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे,कामगार नेते हृषीकांतजी शिंदे, शिवसेना शहर  प्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, महापालिका विरोधी पक्षनेते दत्ता साने,शिवसेना गटनेता राहुल कलाटे, नगरसेवक समीर मासुळकर, राजू मिसाळ, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे,भाजपा महिला अध्यक्ष शैला मोळक, साधना मलेकर,मोरेश्वर भोंडवे, बाबु नायर, सचिन चिखले, तुषार हिंगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, रायगड नगरपरिषदेचे सभापती महेश कोल्हटकर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, शेखर ओव्हाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, आबा लांडगे, आशा भालेकर, स्मिता जगदाळे, मनिषा परांडे, पंचायत समिती सदस्या ज्योती आरगडे, सुखदेव नरळे, संतोष वाळके, दिलीप सावंत, कैलास नेवास्कर, भाऊ काटे, दिलीप दंडवते, रुपाली आल्हाट, रमेश मिलिंदकर, नामदेव भोसले, भास्कर बोरुडे, वेदश्री काळे, बाबू खराबे, उज्ज्वला सावंत, माउली वाळके, अमोल विरकर, किसन तापकीर, आबा भोसले, सचिन सानप,स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे, पांडुरंग भालेकर,उद्योजक रोमी संधू,संतोष बारने, विकास साने, व समस्त भोसरी विधानसभा मतदार संघातिल सर्व विभागप्रमुख,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख, महिला सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button