breaking-newsमनोरंजन

‘लग्न मुबारक’ : सामाजिक भाष्य करणारा

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये अलीकडे नवीन दिग्दर्शक उत्तम विषय घेऊन येत आहेत. चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो.

‘लग्न मुबारक’ ही कथा आहे शिवराज सदाशिव भोसले अर्थात शिव (सिद्धांत मुळे) आणि सारा कुरेशी ( प्रार्थना बेहरे) यांच्या महाविद्यालयीन जीवनात फुलणाऱ्या प्रेमाची.  शिव आणि ईशा ( संस्कृती बालगुडे) यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे, कॉलेज मध्ये त्यांचा ग्रुप फुल्ल टू धम्माल करणारा आहे,  त्यांच्या क्लास मध्ये साराची एंट्री होते आणि शिव साराच्या प्रेमात पडतो. शिव हा छत्रपती शिवरायांचे विचार मानणारा कट्टर शिवप्रेमी तर सारा कट्टर मुस्लिम कुटुंबातुन आलेली मुलगी आहे. दोघेही एकमेकांना आवडत असले तरी असे प्रेम करणाऱ्या प्रेमी युगलांना सामाजिक परिस्थिति अनुकूल नसते हे वास्तव आहे. सारा आणि शिव सुद्धा याला अपवाद नाहीत. त्यात इथे ईशाचे शिववर एकतर्फी प्रेम आहे, पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी ‘लग्न मुबारक’ बघायला हवा.

चेतन चावडा आणि सागर पाठक या नवोदित दिग्दर्शक जोडीनेच चित्रपटाची कथा लिहिली आहे, पाहिलाच प्रयत्न असल्याने चित्रपटाच्या पटकथेमध्ये काही कमतरता जाणवतात. असे असले तरी आजच्या सामाजिक परिस्थिती विषयी त्यांची समज उत्तम असल्याचे दिसते. चित्रपटाचे संवाद चांगले आहेत.

कलकरांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर सिनेमाटोग्राफी, दिग्दर्शक आणि आता अभिनय करणाऱ्या संजय जाधव यांनी साकरलेली इरफान ही व्यक्तीरेखा उत्तम झाली आहे. यांच्यासह प्रार्थना बेहरे,संस्कृती बालगुडे यांनी आपल्या भूमिकाना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आस्ताद काळेचे काम छान झाले आहे, अभिनायत पदार्पण करणाऱ्या सिद्धांत मुळेला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. याशिवाय प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड,वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे, तर अभिनेते महेश मांजरेकर गेस्ट अपिरियन्स मध्ये  आहेत.

‘लग्न मुबारक’ ची गाणी अक्षय कर्डक यांनी लिहिली असून साई – पियुष,  ट्रॉय अरिफ यांनी स्वरबद्ध केली आहेत. आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने आधीच डोक्यावर घेतले आहे, इतर गणीही चांगली झाली आहेत.

‘लग्न मुबारक’ बद्दल एकन्दरीत सांगायचे म्हणजे चांगली प्रेमकथा, गाणी यासाठी हा सिनेमा तुम्ही पाहू शकता, तसेच दिग्दर्शकाने जो संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो उत्तम आहे. आजच्या तरूणाईची भाषा बोलणारा वन टाइम वॉच आहे.

चित्रपट – लग्न मुबारक

निर्मिती – आरव प्रोडक्शन

दिग्दर्शक – चेतन चावडा, सागर पाठक

संगीत – साई -पीयूष, आरिफ ट्रॉय

कलाकार – संजय जाधव, प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, सिद्धांत मुळे आदी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button