breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

नांदेड : माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय, खंदे समर्थक विश्वासु समजले जाणारे विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर हे अ‍ॅन्टीजेन रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले असून त्यांची दहा वर्षाची कन्याही कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत पुढे आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन महिन्यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण हे कोरोनाग्रस्त झाले होते.

मुंबई येथे उपचारानंतर नांदेडला परतले त्याच दिवशी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधीत झाले होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. आणि आता काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाने घेरले आहे.दरम्यानच्या मधल्या काळात माजी महापौर अब्दुल सत्तार व त्यांचे नगरसेवक पुत्र त्यानंतर उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर हे पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांनी कोरोनाशी झुंज देत विजय मिळवीला.

काँग्रेसचे अनेक पुढारी कोरोनाग्रस्त होत असल्याने जनतेच्या कल्याणासाठी फिल्डवर उतरलेले काँग्रेसचे पुढारी पॉझिटिव्ह होत असल्याचे सांगून लवकरच ते बरे होतील असे पत्रक बाधित झालेल्या आमदार अमरनाथ राजूरकर यांनी काढले होते. आता खुद्द तेच कोरोनाबाधित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीस या आमदारांनी उपस्थिती लावली होती.

तसेच दोन दिवसापूर्वी पत्रकारांचे शिष्टमंडळ पालकमंत्री अशोक चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाधित झालेले आमदार तेथे उपस्थित होते. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी व पत्रकारांच्या अडचणीत भर पडून खळबळ उडाली आहे. या सर्व मंडळीना क्वारंटाईन होण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्याने या अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे व आता अमरनाथ राजूकर यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित झालेल्या आमदारांची संख्या 3 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button