breaking-newsताज्या घडामोडी

जेईई मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर! या वेबसाईटवर पाहा निकाल

JEE Main 2024 | नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 च्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. NTA ने आज पहाटे 3 वाजता जेईई मेन परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेला बसलेले विद्यार्थी https://jeemain.nta.ac.in/ च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन निकाल आणि त्यांचा रॅंक चेक करू शकतात.

NTA प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर JEE मुख्य परिक्षेचा निकाल डाऊनलोड करण्यासाठी लिंक देखील जारी केली आहे. विद्यार्थांना त्यांचा निकाल डाऊनलोड करायचा असेल तर या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करता येईल.

हेही वाचा    –     अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार? देवेंद्र फडणवीस म्हणाले..

विद्यार्थ्यांना जेईई मेन परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख मेंन्शन करावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हा निकाल दिसेल.

निकाल कसा पहायचा?

  • सर्वात आधी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • त्यानंतर, होमपेजवर जाऊन View score card किंवा View JEE Main 2024 result लिंक वर क्लिक करा.
  • आता पुढील विंडोवर जाऊन तुमचे लॉगइन क्रेडेन्शिअल्स (जन्मतारीख आणि अर्ज क्रमांक) टाका.
  • ही प्रक्रिया केल्यानंतर उमेदवाराला त्याचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
  • आता तुमचा निकाल चेक करा आणि डाऊनलोड करा.
  • तुम्ही या निकालाची प्रिंट देखील काढू शकता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button