breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महागड्या दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, गुन्हे शाखेची कामगिरी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातून महागड्या दुचाकी चोरून कर्नाटकात विकणा-या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने पर्दाफार्श केला आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात जाऊन या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आजपर्यंत चोरट्यांनी चोरलेल्या 2 बुलेट, 3 एफझेड, 2 पल्सर, 1 पॅशन अशा साडेसात लाखांच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

नेवाळे वस्तीतून 3 सप्टेंबर 2020 रोजी एकाच रात्री दोन बुलेट चोरीला गेल्याची तक्रार आली. त्यानुशंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे सीसीटीव्ही फुटेजद्वारे गुन्हेगारांचा माघ काढत होते. मोबाईल टॉवरचे तांत्रीक विष्लेशनाचे परिक्षण करत त्यांनी मोशीतून अमरेश किसन चव्हाण (वाय 19, रा. डुडूळगाव, मोशी, मूळ रा. कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील तपासानंतर किरण नुरसिंग राठोड (वय 20, रा. वडगाव, ता. मावळ), करण अर्जुन कु-हाडे (वय 19, साईसमर्थनगर, वडगाव, ता. मावळ) यांना तळेगाव येथून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीअंती अन्य दोन साथिदारांसह त्यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या परिसरातून महागड्या दुचाकी चोरून त्या कर्नाटकात विक्री केल्याचे समोर आले. त्यावर उत्तम तांगडे यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांचे पथक तयार करून कर्नाटकातील देवदुर्गा, जि. रायचूर याठिकाणी रवाना केले. सलग चार दिवस पथकाने देवदुर्गा आणि जि. रायचूर परिसरात गुन्हेगारांचा शोध घेतला. दरम्यान, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्याठिकाणी वेगवेगळ्या परिसरात विक्री केलेल्या 7 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 2 बुलेट, 3 एफझेड, 2 पल्सर, 1 पॅशन अशा 8 मोटारसायकली ताब्यात घेतल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहायक फौजदार रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, कर्मचारी बाळू कोकाटे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सोमनाथ बो-हाडे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, अंजनराव सोडगिर, प्रमोद गर्जे, अनंदा बनसोडे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button