breaking-newsआंतरराष्टीय

7 मशिदी बंद, 60 इमामांना काढून टाकले-रमजानमध्ये ऑस्ट्रियाची कारवाई

अंकारा/व्हिएन्ना – रमजानच्या पवित्र महिन्यात ऑस्ट्रियात 7 मशिदी बंद करण्यात आल्उया असून 60 इमामांना बरखास्त करण्यात आले आहे. राजकीय इस्लाम आणि धार्मिक समूहांना मिळणाऱ्या परदेशी धनाविरुद्ध कारवाई अंतर्गत या 7 मशिदी बंद करण्यात आल्याचे आणि 60 इमामांना काढून टाकण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रियन सरकारने दिली आहे या इमामांना तुर्कीकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप होता. रमजानच्या पवित्र महिन्यात ऑस्ट्रियाच्या सरकारने केलेल्या या कारवाईने संतप्त तुर्कीने ऑस्ट्रियावर जोरदार टीका केली आहे.आम्ही तुर्कीच्या नेत्यांची, खास करून चॅन्सेलर सेबेस्टिन क्रूझ यांचा निषेध करतो असे तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर हे अतिक्रमण असल्याचा आरोप तुर्कीचे उप पंतप्रधान बेकिर बोजडॉग यांनी केला आहे.

व्हिएन्नामधील एक कट्टरपंथी तुर्की राष्ट्रवादी मशीद बंद करण्यात येत आहे, आणि सहा मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्या अरब धार्मिक संस्था विसर्जित करण्यात येत असून, सन 2015 च्या एका कायद्यानुसार ही कारवाई करत असल्याचे असे ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सॅबेस्टिन कुर्ज यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button