breaking-newsराष्ट्रिय

१० दिवसात सात मृत्यू, डॉक्टरांचा केदारनाथला जाणाऱ्या ज्येष्ठांना इशारा

केदारनाथच्या दर्शनाला जाणाऱ्या ज्येष्ठांना उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने सावधानतेचा इशारा दिला आहे. केदारनाथ तीर्थस्थळी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे डॉक्टरांकडून हा इशारा देण्यात आला आहे. या मोसमात मागच्या दहा दिवसात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे हे मृत्यू झाले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

यावर्षी केदारनाथला मोठया प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यंदा आरोग्याच्या तक्रारी असलेल्या नागरीकांसाठी केदारनाथमधील परिस्थिती चिंताजनक आहे असे आरोग्य खात्याने म्हटले आहे. केदारनाथमध्ये पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा शनिवारी सकाळी ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गुरुवारी दोन वेगवेगळा घटनांमध्ये राजस्थान जयपूरमधील दोन यात्रेकरुंचा हायपोथेरमियामुळे मृत्यू झाला. केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर ही घटना घडली. दोन्ही महिला होत्या. त्यांचे वय ६० पेक्षा जास्त होते. यावर्षी केदारनाथमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मरण पावलेले सर्वांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त होते. प्रकृतीच्या तक्रारी असणाऱ्या लोकांसाठी आणि वृद्धांसाठी या भागातील वातावरण चिंताजनक आह् असे उत्तराखंड आरोग्य खात्याचे एसएस नेगी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button