ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू नगरपंचायतीसाठी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान

पिंपरी चिंचवड | तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) मतदान होत आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले.देहू नगरपंचायतींच्या 17 प्रभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने प्रभाग 11,12, 14 आणि 15 मधील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आज 13 जागांसाठी मतदान होत आहे.

देहू नगरपंचायतीच्या 13 प्रभागातून 48 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 13, भाजपा 13, शिवसेना 8, तर काँग्रेसचे 5 उमेदवार असून 9 अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काही प्रभागात दुरंगी, तिरंगी तर चौरंगी लढत होत आहेत.

नगरपंचायतीसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ या पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत 28 टक्के, दीड वाजेपर्यंत 45 टक्के आणि साडेतीन वाजेपर्यंत 59 टक्के मतदानाची नोंद झाली. 4452 पुरुष आणि 4096 महिला अशा 8548 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर 5 असे 130 कर्मचारी व प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी तीन पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक आणि 73 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button