TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात १६ ऑक्टोबर रोजी ज्योतिर्विदांचा मेळावा

पुणे : बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फल ज्योतिष अभ्यास मंडळाच्या वतीने ज्योतिर्विदांचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.कै पंडित श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त हा मेळावा होणार आहे. गो.ल. आपटे सभागृह(आपटे रस्ता) अथर्व हॉल मध्ये रविवार,दि.१६ ऑकटोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हा मेळावा होणार आहे.

खासदार गिरीश बापट,अतुलशास्त्री भगरे,प्रतिभा शाहू मोडक,चंद्रकांत शेवाळे यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. अनिल चांदवडकर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तर डॉ प्रसन्न मुळ्ये यांचा षष्टब्दिपूर्ती गौरव करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने नंदकिशोर जकातदार,विजय जकातदार,ऍड.मालती शर्मा,सौ नयना जकातदार,वरुण जकातदार मेघश्याम पाठक,आनंदकुमार कुलकर्णी हे या मेळाव्याचे संयोजन करीत आहेत.

विवाहयोग,संतती योग,शिक्षणयोग,नोकरी व्यवसाय योग,परदेशगमन,कुंडलीवरून आरोग्य मार्गदर्शन,वास्तुशास्त्र,रुलिंग प्लॅनेट,हस्तलक्षण,भावेश विचार,उपासना महत्व इत्यादी विषयावर नामवंत ज्योतिर्विदांची व्याख्याने,संशोधनात्मक प्रबंधांची मांडणी,पुस्तक प्रदर्शन यांचे आयोजन या मेळाव्यात करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button