ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू

पुणे | मागील काही दिवसात पुण्यात वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चतुशृंगी, विमानतळ, हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अपघात झाले आहेत.विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या अपघातात संकेत रामचंद्र भुजबळ (वय 22) आणि ओम राहुल पवळे (वय 17) या दोघांचा मृत्यू झाला आहे. मयत संकेत भुजबळ हा भरधाव वेगात कार चालवत असताना त्याची कार खराडी जवळील बीआरटी बस स्टॉपला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघे जण जखमी झाले आहेत.

चतुशृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्रेमेन चौकाजवळ झालेल्या अपघातात प्रदीप शाम कांबळे (वय 39) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रदीप कांबळे हे सायकलने जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चतुशृंगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिल्ला इंटरनॅशनल हायस्कूल समोरील रस्त्यावर झालेल्या दोन दुचाकी अपघातात अभिजीत चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. अभिजीत शिंदे यांनी भरधाव वेगात दुचाकी चालवून सुरेश टकले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली होती. यामध्ये सुरेश टकले हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदम वस्ती परिसरात एका रिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात यश जितेंद्र पवार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून यश पवार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने यश पवारचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button