breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

गहू खरेदीत तब्बल ‘एवढ्या’ टक्क्यांची वाढ! कृषिमंत्र्यांची माहिती

मुंबई : भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशात गव्हाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी सरकारकडून आधारभूत किंमतीने या गव्हाची खरेदी केली जाते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सरकारकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. अशातच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. मोदी सरकारच्या काळात देशात गहू खरेदीत मोठी वाढ झाल्याचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

२०१४ पासून आत्तापर्यंत गहू खरेदी ४३ टक्क्यांची वाढ झाल्याचे तोमर म्हणाले आहेत. २००५ ते २०१४ मध्ये १ हजार ९७२ लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी होती. यामध्ये मोठी वाढ २०१४ ते २०२३ मध्ये गव्हाची खरेदी ही २ हजार ८११ लाख मेट्रीक टन झाली असल्याची माहिती कृषीमंत्री तोमर यांनी दिली आहे. तसेच यावर्षी हरियाणा आणि पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.

हेही वाचा – भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटातील आमदारानं दिलेली धमकी

सध्या गव्हाचा एमएसपी २,१२५ रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये यंदा गहू खरेदीत ७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही गव्हाच्या खरेदीत वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. राजस्थान आणि बिहारमध्येही गव्हाची खरेदी वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button