breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; शिंदे गटातील आमदारानं दिलेली धमकी

मुंबई : पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मुख्यमंत्री विरोधात लिहिल्याने मारहाण करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची का? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून..विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली. त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.

हेही वाचा – ‘अजित पवार शिखर बँकेतील २५ हजार कोटींचे दरोडखोर’; शालिनीताई पाटील यांचा आरोप

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

जळगाव जिल्ह्यात सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांना ही टीका पचनी न पडल्याने त्यांनी पत्रकाराला थेट शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही, असे म्हणत आपण पत्रकाराला का शिवीगाळ केली हे त्यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button