breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

400 किलो भेसळयुक्त तूप जप्त, दिवाळीच्या तोंडावर एफडीएची मोठी कारवाई

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. एफडीएने छापेमारी करत 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. जप्त केलेल्या तुपाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून तपासणीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार 18 ऑक्टोबर रोजी एफडीएने मुंबईच्या मशीद बंदर परिसरात छापेमारी केली. मशिद बंदरच्या केशवजी नाईक रोडवरील श्रीनाथजी बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या मेसर्स ऋषभ शुद्ध घी भांडार गोदामावर छापेमारी केली. या छाप्यात तेथील तुपाचे 3 प्रकारचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच, उर्वरित 400 किलो तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. बाजारात या तुपाची किंमत 2,99,090 रुपये इतकी आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त खाद्यपदार्थ व मिठाईच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाची दिवाळी सुरक्षित व दिवाळीत ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत. या हेतूने प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

एफडीएच्या या छापेमारीनंतर जप्त केलेल्या तुपाचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय, अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button