breaking-news

#Lockdown : मनसेतर्फे शहरातील गरजुंना अन्नधान्याचे किट घरपोच

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमलात आणलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अनेक मजूर, कष्टकरी कामगार, घरकाम करणाऱ्या व्यक्ती तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबावर अतिशय हालाकीची परीस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून सर्वतोपरी मदत होत आहे. परंतु नागरिक म्हणून अश्या लोकांना मदत करणे हे आपलेसुद्धा दायित्व आहे.

यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी परिसरातील दानशूर नागरिकांच्या वतीने पिं. चिं. शहरातील अतिशय गरजू कुटुबांना साधारण ८ ते १० दिवस पुरेल एवढे लागणारे रेशन देण्याचं कार्य सुरु केले आहे. काही शेकडो गरजूंना ही मदतही करण्यात आली आहे. मात्र हे करीत असताना कोणताही गाजावाजा न करता त्यांनी ही मदत गरजू नागरिकांपर्यंत पोहोच केली आहे.

अजूनही खूप गरजू लोकांचे फोन येत आहेत. हजारो गरजूंना मदत करण्याची इच्छा आहे. हे काम खुप मोठं आहे, कोणालाही मदतीचा हात पुढे करायची इच्छा असेल तर मो. न. ९९२२७५८११५ संपर्क साधावा. आपली कोणत्याही स्वरूपातील मदत योग्य आणि गरजू लोकांनाच पोहोचेल, असे आवाहनही सावळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button