breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सर्वसामान्य जनतेला महागाईचा झटका! सिलेंडरमध्येही ३५० रूपयांची वाढ

व्यावसायिक सिलिंडर २११९.५० रूपयांना मिळणार

मुंबई : महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्य, भाजीपाला आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे एलपीजी सिलिंडर. एलपीजी सिलेंडरच्या दरात ५० रूपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरमध्येही ३५० रूपयांची वाढ झालेली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य जनतेला महागाईचा झटका बसला आहे. कारण गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी आता 1103 रुपये मोजावे लागणार आहेत.

दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २११९.५० रूपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रूपयांचा झाला आहे. वाढलेले दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button