Uncategorized

विधिमंडळ अधिवेशन: संजय राऊतांवर हक्कभंगासाठी भाजपने उठवलं रान, मात्र आमदार भरत गोगावलेंनी असंसदीय शब्दाचा उल्लेख केल्याने फेरले पाणी

  • संजय राऊत यांनी विधिमंडळाची बदनामी केली
  • भाजप आमदारांकडून जोरदार टीका
  • राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी सभागृह डोक्यावर घेतले

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने निर्माण झालेल्या राजकीय वादाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. यावेळी अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी सभागृह डोक्यावर घेतले. भाजपचे आमदार एकापाठोपाठ एक हिरीरीने संजय राऊत यांच्यावर आगपाखड करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी वातावरणनिर्मिती करत होते. संजय राऊत यांनी विधिमंडळाची बदनामी केली आहे, असे भाजपच्या आमदारांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले बोलण्यासाठी उभे राहिले. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी असंसदीय शब्दाचा उल्लेख केला. त्यांनी हे वाक्य उच्चारण्याचा अवकाश की महाविकास आघाडीच्या आमदारांनी उलट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केले. त्यामुळे भाजप आमदारांनी केलेल्या सर्व मेहनतीवर अक्षरश: पाणी फेरले गेले.

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केला, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही सगळ्यांनी ती क्लीप ऐकली आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. ती मर्यादा ओलांडल्यानंतर ‘अती तेथे माती’, हे ठरलेले असते. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आलाच पाहिजे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे भावना प्रचंड भडकत चालल्या आहेत. या माणसाला विधिमंडळाला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाने इतकंही #$%* नसलं पाहिजे. त्यामिळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणा, असे भरत गोगावले यांनी म्हटले.

भरत गोगावेल यांची जीभ घसरल्याचे लक्षात येताच सभागृहात बचावात्मक पवित्र्यात असलेले महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले. बाहेर बोलल्या गेलेल्या गोष्टी सभागृहात तपासल्या जातात. मग इकडे जे आक्षेपार्ह शब्द बोलता, तेदेखील मागे घेतले पाहिजेत, असा पवित्रा घेत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘ ते वक्तव्य तपासून घेऊ, आता बसा’, असे सांगत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संजय राऊतांवरील हक्कभंगाच्या प्रस्तावाबाबत निर्णय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात सभागृहातील मोमेंटम पूर्णपणे बदलले. भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे आक्रमक पवित्र्यात असलेल्या सत्ताधाऱ्यांना ऐनवेळी नमते घ्यावे लागले. यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा भरत गोगावले यांनी आपले शब्द मागे घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button