Uncategorized

24 तासांत 3,49,691 नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,69,60,172 वर

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवलाय. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. बुधवारी देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. त्यानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

देशात मागील 24 तासांत तब्बल 3,49,691 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 2,767 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,69,60,172 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,92,311 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 2,17,113 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,40,85,110 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 26,82,751 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर २२ एप्रिलला दैनंदिन रुग्णवाढीने तब्बल ३ लाखांचा टप्पा पार केला. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची संख्याही धडकी भरवणारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button