breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

31 तास चौकशी केल्यानंतर राणा कपूर यांना ईडीकडून अटक

मुंबई | येस बँकेवर सरकारनं आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. येस बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तब्बल 31 तास चौकशी केल्यानंतर त्यांना आज पहाटे 4 वाजता अटक करण्यात आली आहे.

राणा कपूर यांच्याविरोधात पैशांची अफरातफर अर्थात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल मध्यरात्रीपासून त्यांची चौकशी केल्यानंतर दुपारी ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आलं होतं. त्यानंतर कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी ईडीनं राणा कपूर यांची वरळीतल्या समुद्रमहाल निवासस्थानी चौकशी सुरू होती. येस बँकेच्या प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून 600 कोटी रुपये मिळाले होते, याची चौकशी ईडी चौकशी करत आहे.

राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डीएचएफएल आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशनला कर्ज देत फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. ते वरळीतील समुद्र महल या अलिशान इमारतीत राहतात. राणा कपूर यांना शनिवारी दुपारी बॅलॉर्ड इस्टेट येथ असलेल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं होतं. राणा कपूर यांच्या विरोधात लूक आउट नोटीसही जारी करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button