breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मिलिंद एकबोटे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, हिंदुत्वाच्या मुद्यावर खल

मुंबई | महाईन्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन राजकीय मैदान तापवून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणा-या राजकीय पक्षांमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम 24 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर एकबोटेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचं एकबोटेंनी म्हटलं आहे. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असंदेखील एकबोटे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं

धर्मवीर संभाजी महाराजांचं वढू बुद्रूक हे समाधीस्थान आहे. त्याठिकाणी 24 मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो”, असं मिलिंद एकबोटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button