breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

300 वर्षांची परंपरा खंडित, कोरोनामुळे म्हसोबाची यात्रा रद्द

शहापूर – कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून अनेक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. त्यातच अनेक यात्रा आणि उत्सवही रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, म्हणून राज्य सरकारकडून ही पावलं उचलण्यात आली होती. विशेष म्हणजे मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी म्हसोबची यात्रा सुद्धा यंदा रद्द करण्यात आली.

वाचा :-…अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार, महावितरणकडून 71 लाख ग्राहकांना नोटीसा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली असून, खांबलिंगेश्वर देवस्थानात भरणारी ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी म्हसोबाची यात्रा यंदा रद्द करण्यात आलीय. कोरोनाचं संकट काही अंशी कमी झाल्यानंतर प्रार्थनास्थळे दर्शनासाठी सुरू झालीत. मात्र गर्दी टाळण्यासाठी अनेक उत्सवांवर बंदी आहे. कोकणात येणाऱ्या ठाणे जिल्ह्यात खरीपाच्या हंगामानंतर पौष महिन्यात विविध ठिकाणच्या देवस्थानांत जत्रा भरत असतात.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाडजवळील म्हसा येथील खांबलिंगेश्वर देवस्थानात भरणारी जत्रा सर्वात मोठी मानली जाते. ठाणे, अहमदनगर, पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमधून भक्त, व्यापारी, खवय्ये, जत्रेसाठी मोठ्या संख्येने येत असतात. पाळीव जनावरांच्या खरेदी विक्रीचे म्हसा हे मोठे केंद्र आहे. देशातील जातीवंत खिल्लारी, देशी गाय बैलांची विक्री यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. त्यासोबत कृषीपयोगी अवजारे, साहित्य, घोंगड्या, सतरंज्या, टोपली बाजार अशी अनेक दुकाने या जत्रेत असतात. दहा दिवस चालणाऱ्या या जत्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी बांधवांसाठी ही जत्रा महत्त्वाची असते. अशी ही म्हशाची यात्रा कोविड 19 मुळे रद्द करण्यात आल्याने जनतेमध्ये मोठी नाराजी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button