breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

दिल्लीतील स्फोटानंतर नरिमन हाऊसमधील सुरक्षा वाढवली

मुंबई – नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याच्या घटनेनं दिल्लीसह देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान दिल्ली येथील स्फोटानंतर मुंबईत ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केलं असून त्यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.

वाचा :-…अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार, महावितरणकडून 71 लाख ग्राहकांना नोटीसा

मुंबईत ज्या ज्या ठिकाणी इस्त्रायली बांधव राहतात तिथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कुलाबा येथील नरीमन हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणत ज्यू लोकं राहतात. याच ठिकाणी 26/11 चा हल्ला देखील झाला होता. त्यानंतर या विभागात पोलीस सुरक्षा लावलेली असतेच. मात्र दिल्ली येथील स्फोटानंतर पोलीस इथे अलर्टवर आहेत. या ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोलिसांची विशेष तुकडी दाखल झाली आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर येणाऱ्या सर्व मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button