breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

…अन्यथा वीज पुरवठा खंडित करणार, महावितरणकडून 71 लाख ग्राहकांना नोटीसा

मुंबई – लॉकडाउनमुळे राज्याच्या महसुलात चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे महावितरणने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. थकित वीजबल वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने कारवाई सुरु केली असून तब्बल 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना महावितरकणकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच थकित वीजबिल न देणाऱ्या ग्राहकांची विजजोडणी कापण्याचा धडाका महावितरणने सुरु केला आहे.

नोटिशीची मुदत 30 जानेवाराली संपणार

ग्राहकांनी वीजबिल न दिल्यामुळे महावितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महसुली तूट वाढल्यामुळे महावितरणला आपला कारभार करण्यासाठी कसरत करावी लागतीये. त्यामुळे सरकारने थकित वीजबिलाबाबत कडक भूमिका घेतली आहे. सरकारने राज्यात वीजबिल थकलेल्या तब्बल 71 लाख 68 हजार 596 विजग्राहकांना थेट नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत ग्रहाकांना थकित वीजबिल भरण्याचे बजावण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button