TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अॅड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. यामुळे त्यांचा जेलमधील मुक्काम आता वाढणार आहे.
जाहिरातीचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडून 1 लाख 18 हजार ची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. याप्रकरणी पाच जणांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.