breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

30 जूनपर्यंत मेट्रोच्या कामगारांचे थकीत वेतन अदा होणार

पिंपरी, (महाईन्यूज) – कामगारांचे वेतन रखडवून ठेवल्याच्या निषेधार्त महामेट्रो व्यवस्थापनाच्या विरोधात कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. वेतन देण्याच्या नावाखाली मेट्रो व्यवस्थापनाने वेळोवेळी शब्द फिरवला. परंतु, कामगारांचे वेतन 30 जूनपर्यंत देण्यात यावे, असे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला दिले आहेत.

  • एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टच्या कामगारांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित यांची भेट घेऊन डिंसेबर २०१८ पासून संबंधित कंपनीने कामगारांचे वेतन थकवले असून याबाबत १ मे २०१९ पासून आंदोलन करणार असल्याचे कळविले होते. मात्र, संबंधित कंपनीने वारंवार शब्द फरविल्यामुळे १ जून २०१९ रोजी पुन्हा आंदोलन केले. महामेट्रो प्रकल्प फुगेवाडीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्या कार्यालयात जाऊन ६ जून रोजी आंदोलन केले. त्यावेळी दिक्षित यांनी संबंधित कंपनीकडून २० जूनपर्यंत कामगारांची यादी मागवून घितली. ३० जूनपर्यंत सर्व कामगारांचे थकीत वेतन अदा करावेत. अन्यथा, कंपनीच्या बँक गँरटीमधून अदा केले जाईल अशा सूचना कंपनी व्यवस्थापकाला दिल्या आहेत.

एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बिराजदार यांनी काही कामगारांचे थकीत वेतन २० जून रोजी अदा केले. मात्र, ३० जूनपर्यंत उर्वरीत सर्व थकीत वेतन कंपनी अदा करु शकणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर आज गुरुवारी (दि. २७)  फुगेवाडी येथील महामेट्रोच्या कार्यालयात व्यवस्थापकिय संचालक दिक्षित आले असल्याचे कळताच भापकर व अभिजीत भास्करे, विनोद भालेराव, प्रभाकर माने, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, अरुण गायकवाड, तुकाराम जोगी, पवन बिराजदार यांनी दिक्षित यांच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यावेळी दिक्षितांनी सर्व कामगारांचे थकीत वेतन ३० जूनला अदा केले जाईल. असे आश्वासन दिले. जर, ३० जूनपर्यंत कामगारांचे वेतन अदा झाले नाही, तर कामगार फुगेवाडी येथील महामेट्रो रेल पुणे कार्यालयात आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button