breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्रचार- प्रसार होण्यासाठी मनपाने 50 लाखांचा निधी जाहीर करावा

  • भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांची महापौरांकडे मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरात प्रबोधन, प्रसार, प्रचारार्थ असे विविध उपक्रम राबविण्यासाठी 50 लाख रुपये जाहीर करण्याची मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका गोरखे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूल्यांचा प्रबोधन, प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी महापालिकेने 50 लाख रुपयांचा निधी उपलबध करुन देण्यात यावा.

शब्दांना अंगाराचे रुप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचा शहरात प्रचार प्रसार व्हावा, यासाठी महापालिकेने 50 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button