breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

श्रीनगरमधील चकमकीत जैशचे ३ अतिरेकी ठार, ४ जवान जखमी

श्रीनगर | टीम ऑनलाइन
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील पांथा चौक परिसरात अतिरेकी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यात जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी ठार झाले. या चकमकीत सुरक्षा दलाचे ४ जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती आज सकाळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.

श्रीनगरच्या पांथा चौक परिसरात गुरुवारी सायंकाळी सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी त्या परिसरात दडून बसलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात जैश-ए-मोहम्मदचे ३ अतिरेकी ठार झाले. तर या चकमकीत ३ पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचा एक जवान असे ४ जण जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सुहैल अहमद राठर हा खतरनाक अतिरेकी या चकमकीत मारला गेला. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता, अशी माहिती काश्मीरचे पोलीस अधीक्षक विजय कुमार यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button