breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

दिल्ली | आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरातील गांधी पुतळ्यासमोर नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआर आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे.

या आंदोलनात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या देखील सहभागी झाल्या आहेत. ‘द्वेषाचे राजकारण बंद करा, विषारी राजकारण बंद करा’ तसंच संविधानाला वाचवा, देशाला वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले आहेत. अर्थव्यवस्थेतील अपयश लपवण्यासाठी सरकार सीएए, एनपीआर आणि एनआरीसारखे मुद्दे पुढे करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button