breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात लवकरच 60 ते 70 हजार रिक्त पदांची टप्प्याटप्प्याने मेगाभरती… अजित पवार

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लवकरच 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी टप्प्याटप्प्याने मेगाभरती करणार आहे. सुरुवातील पोलीस दलातील आठ हजार पदं भरणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

शिक्षण, ग्रामविकास, गृह, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, कृषी, पशु व संवर्धन आणि आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. फडणवीस सरकारने मेगाभरती करण्याचं आश्वासन दिलं पण ती रखडली. अखेर आता महाराष्ट्र विकास आघाडी मेगाभरती करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळणार आहे.

सरकारमधील बऱ्याचशा जागा भरण्याचा निर्णय घेतला असून पहिल्यांदा आठ हजार पोलिसांची भरती होणार आहे ती भरती झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांमध्ये जी काही कमतरता आहे, मग ती शिक्षक, कृषीसेवक, ग्रामसेवक, किंवा परिचारिकांची असा एकंदरीत आढावा घेणार असून जवळपास 60-70 हजार पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्याचं काम या सरकारला करावं लागणार आहे. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button