breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

महाबळेश्वरमध्ये कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

महाबळेश्वर |टीम ऑनलाइन
 आपल्या तीन मित्रांसह तापोळा येथे फिरण्यासाठी आलेल्या एका २९ वर्षीय तरुणाचा कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामदास भिकन डावले असे या मृत तरुणाचे नाव असून महाबळेश्वर तालुक्यातील बोंडारवाडी (धनगरवाडी) येथील तो रहिवासी होता. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान व स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या नातेवाइकांना हा घातपाताचा संशय वाटत असून तशी तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली केली आहे. रामदास यांना दोन मुले असून घरची आर्थिक स्थिती गरिबीची आहे.

रामदास भिकन डावले हा तरुण महाबळेश्वरजवळच्या मेटगुताड येथील हॉटेल पिकाडेलमध्ये कामास होता. याच हॉटेलमध्ये कामाला असलेले रामदास याचे मित्र शशिकांत काशिनाथ ओंबळे सध्या रा. भिलार, शुभम तांडेकर रा. पुणे व सागर भैय्यालाल कोल रा. मध्य प्रदेश हे चौघे मंगळवारी सायंकाळी फिरण्यासाठी त्यांच्या गाडीने अहीर वानवली येथील शिवसागर जलाशय परिसरात आले होते. यामधील रामदास डावले या तरुणाचा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पडून मृत्यू झाला. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनील भाटिया, अनिल केळगने, सनी बावळेकर, सूर्यकांत शिंदे, सुरेश डोईफोडे, अभय डोईफोडे, तुकाराम शिंदे, शंकर ढेबे आदींसह स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह जलाशयाबाहेर काढला. त्याचे नातेवाईक हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत असून या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासनाने करावा, अशी मागणी करीत आहेत. याबाबतची माहिती शांताराम रामचंद्र डावले यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button