breaking-newsआंतरराष्टीय
गोवा राज्याला मिळू शकतात नवीन मुख्यमंत्री !
नवी दिल्ली – गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली आहे. बुधवारी मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर हे पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे अमेरिकेला रवाना झाले आहेत.
दरम्यान २२ आॅगस्ट रोजीच पर्रिकर अमेरिकेहून उपचार घेऊन गोव्यात आले होते. मात्र काही तासानंतरच त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागले होते. प्राथमिक अंदाजानुसार ते आठवडाभरासाठी ते पुन्हा अमेरिकेत गेले आहेत.
दरम्यानच्या काळात गोवा राज्याच्या सरकारी कामकाजावर यामुळे परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी नेतृत्व तयार करण्यासंबंधी भाजप पक्षामध्ये विचार विनियम सुरू आहे.भाजपाची कोअर कमिटी आज नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेणार आहे.