breaking-newsपुणेमहाराष्ट्र

25 महाविद्यालयांना 10 टक्के वाढीव जागा

प्रवेश न मिळालेल्यांना पदवी प्रथम वर्षाला मिळणार प्रवेश

 नामांकित महाविद्यालयांचा समावेश

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 25 हून अधिक महाविद्यालयांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी 10 टक्‍के जागा वाढवून दिली आहे. यात शहरातील नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे चांगले गुण मिळूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना बीकॉम, बीएस्सी आणि बीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत.

यंदा बारावीचा निकाल 90 टक्‍क्‍यांच्या आसपास लागला आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश फुल्ल झाले आहेत. त्यानंतर अजूनही प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयाने एकूण प्रवेश क्षमतेच्या 10 टक्‍के जागा वाढवून मिळावी, अशी मागणी विद्यापीठाकडे केली होती. त्यानुसार महाविद्यालयाने विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केले.

दरम्यान, पुणे विद्यापीठाने ज्या महाविद्यालयांचे 10 टक्‍के जागा वाढवून मिळण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्या महाविद्यालयांना 10 टक्‍के जागा भरण्यास मान्यता दिली आहे. विद्यापीठ संलग्नित एकूण 25 हून अधिक महाविद्यालयांना जागा वाढवून देण्यात आल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नता विभागाकडून देण्यात आली. या महाविद्यालयांनी आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्‍यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

जलदगतीने वाढीव तुकडींना मान्यता

नॅक मूल्यांकन केलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांना वाढीव तुकडी जलदगती पद्धतीने राज्य शासनाकडून दिली जाणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. कायमस्वरुपी प्राचार्य पद, पुरेसा वर्ग, शिक्षक असलेल्या महाविद्यालयांना वाढीव तुकडी मिळणार आहे. तसेच, महाविद्यालयात 5 पेक्षा अधिक तुकडी असता कामा नये. अशा महाविद्यालयांना वाढीव तुकडी मिळेल. त्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव स्विकारण्यात येत असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. हे सर्व प्रस्ताव 10 ऑगस्ट रोजी पुणे विद्यापीठ राज्य शासनाकडे सादर करेल. त्यावर 30 ऑगस्टपर्यंत वाढीव तुकडी मान्यतेचा निर्णय जाहीर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button