breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपकडून लोकांची भ्रमनिराशा – जयंत पाटील

भोसरी – निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने लोकांना स्वप्ने दाखवून वाट्टेल ती आश्वासने दिली. मात्र, चार वर्षात ती आश्वासने पुर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे भाजपकडून लोकांचा पुर्ण भ्रमनिराशा झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, देशात शेतक-यांच्या आत्महत्या सुरुच असून तो पहिल्यांदा संपावर गेला आहे. सरकारने दिलेली आश्सावन पुर्ण न केल्याने शेतकरी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत आहे. महागाई वाढली आहे, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चार वर्षात भाजप विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मुख्यमंत्र्याचे नागपूर शहर गुन्हेगारांची शहर झाले आहे. राज्यात पोलिसच गुन्हे करत आहेत. गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग वाढत चालला आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे गृहखात्यावर कसलेच नियंत्रण राहिले नाही”
राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत. त्यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. त्या पक्षात ते नाराज असून गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आहे. काही कामानिमित्त भेटल्यास ते आपली नाराजी बोलवून दाखवितात. मी त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. अनेक जण पक्षात परत येणासाठी इच्छुक आहेत. परंतु, पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासोबत राहिलेल्यांना विचारात घेऊन त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल” असेही पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button