Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘२०२९ मध्ये ३ लाख ४६ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार!’ – ओमराजे निंबाळकर

खासदार नोकरी महोत्सवात विजयाचा विश्वास व्यक्त; ‘कामे केली असतील तरच मला मतदान करा’, मतदारांना आवाहन

धाराशिव : आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३ लाख २९ हजार ८४६ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता २०२९ मध्ये ३ लाख ४६ हजार ८४७ किंवा त्यापेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून येऊ, असा दावा त्यांनी केला. धाराशिव येथील छायादीप लॉन्समध्ये आयोजित खासदार नोकरी महोत्सव २०२६ मध्ये ते बोलत होते.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा रोजगार महोत्सव पार पडला. यावेळी निंबाळकर यांनी आपल्या कामाच्या जोरावर आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. “मी हे कॉन्फिडन्सच्या जोरावर बोलत आहे. तुमची कामे केली असतील तरच तुम्ही मला मतदान करा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

हेही वाचा –  एमआयटी एसीएससी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; संस्थेच्या नावावर पहिले डिझाइन पेटंट!

५० हून अधिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्तिपत्र देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

धाराशिवमध्ये उद्योग उभारणीला चालना देणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी धाराशिव जिल्ह्यात लॉजिस्टिक्स पार्क, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक साहित्य व उपकरणांची निर्मिती करणारे उद्योग तसेच रोजगाराभिमुख प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना नोकरीसाठी इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागू नये, यासाठी उद्योगनिर्मितीवर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविणे, नवीन उद्योगांना चालना देणे आणि स्थानिक युवकांच्या कौशल्याला योग्य संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मोठ्या उद्योगांसह लघु व मध्यम उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि धाराशिवची औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी राज्याच्या उद्योग विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group