Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एमआयटी एसीएससी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; संस्थेच्या नावावर पहिले डिझाइन पेटंट!

अळंदी : संशोधन, नवकल्पना आणि बौद्धिक संपदा निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत MAEER’s MIT आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अळंदी (पुणे) या महाविद्यालयाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या नावावर संस्थेचे पहिले डिझाइन पेटंट नोंदणीकृत झाले असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.

महाविद्यालयाच्या वतीने ‘Renewable Energy-Powered Waste Disposal System’ (नवीकरणीय ऊर्जेवर आधारित कचरा विल्हेवाट प्रणाली) या अभिनव संकल्पनेसाठी भारत सरकारच्या पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून डिझाइन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सदर डिझाइनची नोंदणी क्रमांक 491506-001 असून, अर्जदार म्हणून MAEER’s MIT Arts, Commerce and Science College आणि श्री. वैभव सोपान गलबले यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या अर्जाची नोंदणी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी झाली आहे.

या यशामध्ये महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व संशोधक श्री. वैभव सोपान गलबले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या संशोधनवृत्ती, कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाविद्यालयाच्या नावावर हे पहिले पेटंट मिळविणे शक्य झाले आहे.

हेही वाचा –  ‘गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय; या चर्चांमध्ये मला रस नाही!’ – सुप्रिया सुळे

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाघपारे यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल संशोधन विभागाने विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच महाविद्यालयाच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता (Dean – Research & Development) यांनी संपूर्ण महाविद्यालय परिवाराचे अभिनंदन केले.

या यशामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम, तंत्रज्ञान विकास आणि बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महाविद्यालयाने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण संशोधनातून समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न राहणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group