Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेत मोठा राजकीय भूकंप; मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाचा दारुण पराभव

US Midterm Elections Results | अमेरिकेच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडवत डेमोक्रॅटिक पक्षाने मध्यावधी निवडणुकीत (Midterm Elections) दणदणीत विजय मिळवला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला धूळ चारत डेमोक्रॅट्सनी अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर प्रतिनिधिगृह (House of Representatives) आणि सेनेट (Senate) आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. इराण युद्धाची भूमिका, इस्रायलला दिलेली मदत आणि एककल्ली राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे जनतेत असलेल्या नाराजीचा फटका रिपब्लिकन पक्षाला बसल्याचे मानले जात असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन वर्षांनंतर ट्रम्प यांना मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय दणका मानला जात आहे.

“मी स्वतः उभा आहे असे समजून मतदान करा,” असे भावनिक आवाहन ट्रम्प यांनी केले होते; मात्र त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी नाकारले. टेक्सास, कॅन्सस, आयोवा, ओहायो, जॉर्जिया, मेन, नॉर्थ कॅरोलिना आणि साउथ कॅरोलिना यांसारख्या दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले राहिलेल्या राज्यांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने मुसंडी मारली. अनेक राज्यांत गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षाचे वर्षानुवर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. या निकालावरून खुद्द रिपब्लिकन पक्षातील एका नेत्याने “ट्रम्प पर्व संपले” अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा

ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्गावर ठिय्या आंदोलन; ४ हजारांहून अधिक वाहने अडकली

सेनेटमधील नियंत्रण ट्रम्प यांच्यासाठी डोकेदुखी का ठरणार?

प्रतिनिधिगृहातील ४३५ जागांपैकी बहुमताचा २१८ चा आकडा डेमोक्रॅट्सनी पार केलाच, शिवाय शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या १०० सदस्यीय सेनेटवरही ताबा मिळवल्यामुळे सेनेटमधील हे नियंत्रण ट्रम्प यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे; कारण फेडरल न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या नियुक्त्यांना मंजुरी देणे किंवा फेटाळण्याचे विशेषाधिकार सेनेटकडे असतात, तसेच आंतरराष्ट्रीय करार आणि धोरणांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी सेनेटची मंजुरी अनिवार्य असल्याने आता ट्रम्प यांच्या एकतर्फी कारभारावर आणि धोरणांवर विरोधकांचा थेट अंकुश राहणार आहे.

“मी निवडणुकीत असतो तर जिंकलो असतो”; ट्रम्प यांची प्रतिक्रिया

निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य केला. “मी हा निकाल स्वीकारतो आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिनंदन करतो. आम्ही त्यांच्यासोबत काम करू,” असे सांगतानाच, “मी स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो, अन्यथा आमचा दणदणीत विजय झाला असता,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group