TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

कर्वे रोड, चांदणी चौक, बालेवाडी, ताथवडे, मुळशीसह अनेक भागांत मुसळधार सरी; बारामती आणि इंदापूरमधील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा.

पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज सकाळीही कायम असून, अनेक भागांत मुसळधार सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. दुसरीकडे, पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र, दुष्काळाचा सामना करणाऱ्या काही भागांतील शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस

पुण्यातील कर्वे रोड, चांदणी चौक, बालेवाडी, ताथवडे आणि मुळशी परिसरात पावसाचा जोर कायम आहे. याशिवाय सिंहगड रोड, हडपसर, स्वारगेट, कोथरूड आणि शिवाजीनगर या प्रमुख भागांमध्येही काल रात्री जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर असलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आज सकाळीही शहरातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत.

हेही वाचा – राजकारणात शत्रुत्व नसतं, फक्त विचारधारा वेगळ्या असतात; अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचले; वाहतुकीवर परिणाम

पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. चाकण चौक आणि तळेगाव मार्गावरही पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला आहे. पुण्यात आधीच वाहतूक कोंडीची समस्या असताना रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही परतीच्या पावसाची हजेरी

पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातही परतीच्या पावसाने जोर धरला आहे. शहरातील विविध भागांमध्ये जोरदार सरी कोसळत असून, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.

बारामती आणि इंदापूरमधील शेतकऱ्यांना दिलासा

एकीकडे पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असताना दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बारामती आणि इंदापूर तालुक्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसामुळे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. तर बारामती शहरात आज पहाटेपासून अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button