Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या महारॅलीला सुरुवात; राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी रामलीला मैदानाकडे रवाना

नवी दिल्ली | मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) आणि निवडणुकांमधील कथित गैरप्रकारांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (I.N.D.I.A.) आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून देशभरात आंदोलने सुरू असून, आज दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. या महामोर्चासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते रामलीला मैदानावर दाखल झाले आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (SP) खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत.

हेही वाचा

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची कुटुंबीयांशी भेट

मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांवरून संताप

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात (SIR) गंभीर त्रुटी आणि गैरप्रकार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा दावा करत विरोधकांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विरोधी पक्षांच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रामलीला मैदान व परिसराला छावणीचे स्वरूप आले असून वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button