आटलवाडी, नानवडेतील आदिवासी कुटुंबांना आधार, जितेंद्र यादव यांच्या हस्ते मदत किटचे वाटप
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ उपक्रम

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ऊर्फ जितूभाऊ यादव यांनी आटलवाडी गावातील १५ आदिवासी कुटुंबांना मदत किटचे वाटप केले. स्थानिक कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने यादव यांनी या मदतकार्यासाठी पुढाकार घेतला.
आटलवाडीतील वाटप हे ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या व्यापक सेवाभावी उपक्रमाचा भाग आहे. आमदार लांडगे यांच्या २७ नोव्हेंबरच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक, हार-तुरे आणि सत्कारांवरील खर्च गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी आणि दुष्काळग्रस्त गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा
कोल्हेवाडी-१ मध्ये राणीमाई पठारे यांच्या हस्ते २१३ कुटुंबांना मदत किटचे वाटप
या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील नानवडे येथेही १०० आदिवासी कुटुंबांना मदत देण्यात आली. आटलवाडीत जितेंद्र यादव यांनी गावपातळीवर पुढाकार घेत १५ कुटुंबांपर्यंत मदत किट पोहोचवली.
“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या परिसरातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावावा, या भावनेतून आटलवाडीत मदत किटचे वाटप केले. गावातील १५ आदिवासी कुटुंबांपर्यंत ही मदत प्रत्यक्ष पोहोचवता आली, याचे समाधान आहे. अडचणीच्या काळात आपल्या गावातील कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, ही आपली जबाबदारी आहे.”
– जितेंद्र (जितूभाऊ) यादव, सामाजिक कार्यकर्ते.




