पिंपरी / चिंचवडताज्या घडामोडी

कोल्हेवाडी-१ मध्ये राणीमाई पठारे यांच्या हस्ते २१३ कुटुंबांना मदत किटचे वाटप

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर तालुक्यात ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा गणातील कोल्हेवाडी-१ येथे २१३ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा तथा प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका राणीमाई अशोक पठारे यांनी पुढाकार घेऊन ही मदत कुटुंबांपर्यंत पोहोचवली.

भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत हे वाटप करण्यात आले. गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने पठारे यांनी कोल्हेवाडी-१ येथे या उपक्रमाचे आयोजन केले.

हेही वाचा

खडकुंब्यात १५० कुटुंबांना महिन्याच्या किराण्यासाठी ‘एक हात मदतीचा’

पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. कोल्हेवाडी-१ मधील कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयाच्या वतीने राणीमाई पठारे आणि वाटपासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हेवाडी-१ मधील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावावा, या भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवला. गावातील २१३ गरजू कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत थेट पोहोचवता आली, याचे समाधान आहे. या वाटपासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आणि सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”

– राणीमाई अशोक पठारे, महिला व बालकल्याण समिती सभापती, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group