Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: बॉक्सिंगमध्ये एकाच दिवशी ‘गोल्डन हॅटट्रिक’, सुवर्णपदकांची संख्या १४ वर

Asian Games 2026 | आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये २ ऑक्टोबरचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी रिंगमध्ये अप्रतिम वर्चस्व गाजवत एकाच दिवशी सलग तीन सुवर्णपदकांची ऐतिहासिक ‘हॅटट्रिक’ नोंदवली. लव्हलिना बोरगोहेन, परवीन हुड्डा आणि युवा बॉक्सर अंकुश पंघाल यांच्या या सुवर्ण कामगिरीच्या जोरावर भारताच्या एकूण सुवर्णपदकांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तीन मानकरी

लव्हलिना बोरगोहेन (महिला ७५ किलो)

ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन हिने आपल्या वाढदिवशी सुवर्णपदकाची अविस्मरणीय भेट देशाला दिली. अंतिम फेरीत तिने २०२६ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची सुवर्णपदक विजेती चीनची खेळाडू बाओ झियी हिचा ५-० असा एकतर्फी धुव्वा उडवला. यासह तिने २०२२ मधील हांगझोऊ स्पर्धेतील आपल्या रौप्यपदकाचे रूपांतर थेट सुवर्णपदकात केले.

हेही वाचा

‘CJPचं आंदोलन आम आदमी पार्टीचं; भाजप आणि मोदींना विरोध करण्यासाठी आंदोलन’

परवीन हुड्डा (महिला गट)

लव्हलिनानंतर भारताची स्टार बॉक्सर परवीन हुड्डाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत तिने चायनीज तैपेईची पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती चेन निएन-चिन हिच्यावर ३-२ असा निसटता पण रोमहर्षक विजय मिळवला. उपांत्य फेरीत चीनच्या ली शू हिला ५-० ने नमवणाऱ्या परवीनने मागील सर्व अडथळे आणि २२ महिन्यांच्या बंदीचा काळ मागे टाकत हे दिमाखदार यश मिळवले.

अंकुश पंघाल (पुरुष ८० किलो)

अवघ्या २१ वर्षीय युवा बॉक्सर अंकुश पंघालने दक्षिण कोरियाच्या किम मिनसॉन्गचा ४-० अशा स्प्लिट निर्णयाने पराभव करत भारतासाठी बॉक्सिंगमधील तिसरे सुवर्ण जिंकले. उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या विद्यमान जागतिक विजेत्याला ४-१ ने नमवणाऱ्या अंकुशने २०१८ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा (अमित पंघालनंतर) पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरण्याचा बहुमान पटकावला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button