TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘CJPचं आंदोलन आम आदमी पार्टीचं; भाजप आणि मोदींना विरोध करण्यासाठी आंदोलन’

शिवाजी पार्क आंदोलनावर विखे पाटलांची टीका; दुष्काळी मदतीवर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा, राम शिंदे नाराज नसल्याचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)कडून प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही अभिजीत दिपके यांनी ‘जेल भरो’ आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी CJPच्या आंदोलनावर टीका केली आहे. CJPचे आंदोलन आम आदमी पार्टीशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला.

“विशिष्ट वातावरणात एखादं आंदोलन उभं राहतं. त्यानंतर त्यांना देशात आपली लोकप्रियता वाढल्याचा भ्रम होतो. CJPचं आंदोलन हे आम आदमी पार्टीचं आहे. जे अरविंद केजरीवाल बोलतात, तेच CJP बोलत आहे. या आंदोलनाला कोणताही आधार नाही. फक्त भाजप आणि पंतप्रधानांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन आहे,” असे विखे पाटील म्हणाले.

CJPने २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर दिपके यांनी आंदोलन मागे न घेता ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची भूमिका जाहीर केली होती. CJPच्या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाशी (SIR) संबंधित आक्षेप हा आहे.

ठाकरे बंधूंच्या आंदोलनावरही टीका

ठाकरे बंधूंकडून निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबतही विखे पाटील यांनी भाष्य केले. “SIRच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मग आता आंदोलन कशासाठी करायचे?” असा सवाल त्यांनी केला.

दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांनी आपली ताकद शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वापरावी, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, राज्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून विविध उपाययोजना सुरू आहेत आणि अशा वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  ‘‘पुढारी मावळ गौरव’’ सन्मान सोहळा’ जल्लोषात साजरा

‘दुष्काळासाठी सरकारकडून मोठी मदत’

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि सरकारच्या मदतीबाबत विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. उर्वरित काही तालुकेही दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDRFच्या निकषांपेक्षा अधिक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्जमाफी आणि वीजबिल माफी करण्यात आली आहे. दुष्काळासाठी सरकार मोठ्या प्रमाणात मदत करेल,” असा दावा विखे पाटील यांनी केला.

सरकारवर कितीही टीका झाली तरी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. “आमचे देणारे सरकार आहे. आम्ही शंभर टक्के लोकांच्या मागे उभे आहोत,” असेही ते म्हणाले.

राम शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर काय म्हणाले?

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विखे पाटील यांनी राम शिंदे नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

“राम शिंदेंशी माझे बोलणे झाले आहे. ते कुठेही नाराज नाहीत. बँक निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया आधी पूर्ण होऊ द्यावी. त्यानंतर चर्चा करण्यासाठी बराच वेळ आहे,” असे विखे पाटील यांनी सांगितले.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकारण बाजूला ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित विषयावर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुष्काळी आढावा बैठकीत विखे पाटील आणि राम शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र जिल्हा बँक निवडणुकीतील मतभेदांबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button