Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू मैदानात! ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार देशातला सर्वात मोठा महामोर्चा

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात इतर दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात एकत्र येत थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठीच निर्णय घेतले जात असल्याचे आयोगातील इतर दोन आयुक्तांच्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. देशातील स्वायत्त संस्थांना मोदी-शाहांचे घरगडी बनवले गेले असून, ही थेट लोकशाहीची हत्या आणि स्वातंत्र्याची गळचेपी आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदावर राहतील, तोपर्यंत देशाच्या लोकशाहीची प्रकृती बिघडलेलीच राहील,” असा घणाघात राऊत यांनी केला.

हेही वाचा

“हा माझा शेवटचा वर्ल्डकप, देशासाठी सर्वस्व पणाला लावणार!”; विराट कोहलीचे २०२७ च्या वर्ल्डकपबाबत मोठे वक्तव्य

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राचा रोष दाखवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. “या चर्चेनंतर ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत एक विराट आणि ऐतिहासिक महामोर्चा काढण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून, सर्वांनी एकत्र येण्याची ठाकरे बंधूंची इच्छा आहे. यासंदर्भात काँग्रेस, राहुल गांधी आणि इतर सर्व प्रमुख विरोधी पक्षांशी चर्चा सुरू असून, सर्वांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

२ ऑक्टोबरच्या आंदोलनालाही पाठिंबा

दरम्यान, अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. देशात निर्माण झालेले जनक्षोभाचे वातावरण पाहता दबाव झुगारून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला या गंभीर प्रकाराची दखल घ्यावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button