Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमधील रखडलेले रस्ते, वाहतूक कोंडीवर संयुक्त पाहणी

कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रस्त्याचा आढावा

– कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवड । परिसरातील रखडलेली रस्त्यांची कामे, कुणाल आयकॉन रोडवरील वाहतूक कोंडी आणि मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे यांची लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी केली. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे आणि महापालिकेचे नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी कामांच्या सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. नगरसेविका अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे आणि नगरसेवक जयनाथ काटे या दौऱ्यात सहभागी झाले होते.

कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया या प्रस्तावित विकास आराखडा (डी.पी.) रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती पाहणीदरम्यान तपासण्यात आली. परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचे काम पुढे नेण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने हाती घेण्याचे ठरले. तसेच द्वारका हाइट्सजवळील आर्मी बॅकसाईड रोडचा सुमारे ३० ते ४० मीटरचा अपूर्ण भाग पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करण्याबाबत चर्चा झाली.

हेही वाचा –  ‘तन्वी द ग्रेट’ : स्वप्न, जिद्द आणि स्वीकाराची भावस्पर्शी कहाणी!

कुणाल आयकॉन रोडवरील फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला. शत्रुघ्न काटे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिक्रमणांविरोधात तातडीने मोहीम राबवण्याचा आग्रह धरला. पदपथांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये आणि पादचाऱ्यांना मोकळेपणाने चालता यावे, यासाठी आवश्यक ठिकाणी कुंपण किंवा सुरक्षा कठडे बसवता येतील का, याची व्यवहार्यता तपासण्याचेही ठरले.

मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे सुरू करण्याच्या सूचना

मिलिटरी हद्दीलगत नव्याने सुरू झालेल्या रस्त्याच्या कडेला असलेले बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना पाहणीवेळी देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिव्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. पाहणीदरम्यान लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. आवश्यक तांत्रिक बाबी तपासून संबंधित कामांना गती देण्याची ग्वाही नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपळे सौदागरमधील नागरिकांना दैनंदिन प्रवासात भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आज प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी केली. कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला. कुणाल आयकॉन रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करावी, तसेच पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे राहावेत, यासाठी उपाययोजना कराव्यात, असा आग्रह धरला. मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे तातडीने सुरू करणे आणि द्वारका हाइट्सजवळील अपूर्ण रस्ता पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करणे, याबाबतही चर्चा झाली. पाहणीत ठरलेल्या उपाययोजनांची लवकर अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू.”

– शत्रुघ्न (बापू) काटे, भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group