Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर; आज सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरेंचा दौरा

फडणवीस-शिंदेंनंतर सुनेत्रा पवार नांदेडमध्ये, आदित्य ठाकरे सोलापूर-धाराशिवसह नांदेडमध्ये पाहणी करणार; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

नांदेड : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे नेते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील भागांची पाहणी केली.

आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, लोहा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सकाळी ८ वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार असून, त्यानंतर सकाळी ९ वाजता पिकांची पाहणी करण्याचे नियोजन आहे.

राज्यातील पावसाच्या तुटीमुळे अनेक भागांमध्ये पिकांवर परिणाम झाला आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे निम्माच पाऊस झाल्याने सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे पाहणीदरम्यान समोर आले.

हेही वाचा –  भक्तिभावात गणरायाला निरोप; मुंबईतील विसर्जन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार

आदित्य ठाकरेंचाही दुष्काळ पाहणी दौरा

दरम्यान, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हेही आज दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सोलापूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांची स्थिती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत.

आदित्य ठाकरे सकाळी १०.३० वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे, तर दुपारी १२ वाजता लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथे पाहणी करण्याचे नियोजन आहे.

यानंतर दुपारी ४ वाजता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ येथेही ते दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

शेतकरी मदतीकडे लक्ष

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता हे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. सरकारकडून नुकसानीचे पंचनामे आणि मदत प्रक्रियेवर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पाहणीदरम्यान शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे आजच्या सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि नुकसानीबाबत त्यांच्याकडून कोणत्या मागण्या करण्यात येतात, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button