TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे विभागात FDA ची मोठी कारवाई; ८४९ आस्थापनांची तपासणी, ४६ हजार किलो संशयित अन्नसाठा जप्त

४४० आस्थापनांना सुधारणा नोटिसा; ६९ परवाने निलंबित, १६० प्रकरणे निकाली काढत १८.४३ लाखांचा दंड वसूल

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात मोठी कारवाई केली आहे. १ ते २३ सप्टेंबरदरम्यान पुणे विभागातील ८४९ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये त्रुटी आढळलेल्या ४४० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

गंभीर त्रुटी आढळलेल्या आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाईही करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत पुणे विभागात १७६ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, या कारवाईतून १८.४३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

४६ हजार किलो संशयित अन्नसाठा जप्त

गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, खवा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच उपवासाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष केंद्रित केले.

पुणे विभागातून विविध अन्नपदार्थांचे ६७२ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. भेसळीचा संशय असलेल्या ४६,२६६.०२ किलो अन्नसाठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. या जप्त साठ्याची अंदाजे किंमत १ कोटी ५२ लाख २४ हजार रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा –  दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी-विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर; आज सुनेत्रा पवार आणि आदित्य ठाकरेंचा दौरा

राज्यात पुणे विभागाची मोठी कारवाई

राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्वाधिक सुधारणा नोटिसा पुणे विभागातून बजावण्यात आल्या, तर राज्यातील सर्वाधिक १६० प्रकरणे पुणे विभागात निकाली काढण्यात आली.

पुणे विभागातील कारवाई एका नजरेत

८४९ — अन्न आस्थापनांची तपासणी

४४० — सुधारणा नोटिसा

६९ — परवाने निलंबित

१७६ — कायदेशीर प्रकरणे दाखल

१६० — प्रकरणे निकाली

१८.४३ लाख रुपये — दंड वसूल

६७२ — अन्न नमुने विश्लेषणासाठी

४६,२६६.०२ किलो — संशयित अन्नसाठा जप्त

₹१.५२ कोटी — जप्त साठ्याची अंदाजे किंमत

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button