Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारराष्ट्रिय

किंमत जास्त तरीही क्रेझ कायम! iPhone 18 Pro खरेदीसाठी मुंबई-दिल्लीत ॲपल स्टोअर्सबाहेर तुफान गर्दी

Iphone 18 Pro | टेक जगतात बहुप्रतिक्षित असलेल्या ॲपलच्या ‘२०२६ फॉल लाइनअप’मधील नवीन उत्पादनांची अधिकृत विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल्स असलेल्या ‘आयफोन १८ प्रो’ (iPhone 18 Pro) आणि ‘आयफोन १८ प्रो मॅक्स’ (iPhone 18 Pro Max) खरेदी करण्यासाठी देशभरातील ॲपल स्टोअर्सबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. मुंबई, दिल्ली, नोएडा आणि बंगळुरू येथील प्रमुख ॲपल स्टोअर्सबाहेर खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

नवीन आयफोन सर्वात आधी आपल्या हातात असावा या उत्सुकतेपोटी अनेक ग्राहक पहाटेपासूनच दुकानांबाहेर ठाण मांडून बसले होते. लाँचच्या पहिल्या दिवशी ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ॲपलने आपली स्टोअर्स नेहमीपेक्षा लवकर, म्हणजेच सकाळी ८ वाजताच उघडली. ही स्टोअर्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. फोनची किंमत जास्त असूनही चाहत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही; तासन्‌तास रांगेत उभे राहून ग्राहकांनी नवीन आयफोन खरेदी केला.

हेही वाचा

राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आमदार महेश लांडगे यांनी घेतले आशीर्वाद

ऑनलाइनसह देशभरातील सहा स्टोअर्समध्ये विक्री

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्स हे मॉडेल्स ॲपलच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरसह भारतातील सर्व सहा थेट (रिटेल) स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय, ॲपलच्या २०२६ फॉल लाइनअपमध्ये केवळ आयफोन १८ प्रो सीरिजच नव्हे, तर ‘एअरपॉड्स ५’ (AirPods 5), ‘ॲपल वॉच सीरिज १२’, ‘ॲपल वॉच अल्ट्रा ४’ आणि टेक जगताचे विशेष लक्ष वेधून घेणारा कंपनीचा पहिला वहिला फोल्डेबल फोन ‘आयफोन ड्युओ’ (iPhone Duo) यांचाही समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button