Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

संसदेच्या विशेष अधिवेशनावरून राजकारण तापले! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली | केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे तर २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार आहे. या विशेष अधिवेशनात नेमकी कोणती विधेयके मांडली जाणार आहेत, हे सरकारने अद्याप स्पष्ट केले नसले तरी, महिला आरक्षणाच्या संदर्भातील लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचे (पुनर्रचना) घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या विशेष अधिवेशनावरून मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न म्हणजे राज्यघटनेवरील मोठा हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. रमेश म्हणाले की, “मोदी सरकारने १४ एप्रिल २०२६ रोजी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक समोर आणले होते आणि १७ एप्रिल २०२६ ला या विधेयकाचे जे व्हायचे होते ते झाले होते. मात्र, आता संविधान दिनाच्या निमित्ताने सरकारने विशेष अधिवेशनाची घोषणा केली आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्यघटनेचा यापेक्षा दुसरा मोठा अपमान आणि राज्यघटनेवरील यापेक्षा मोठा हल्ला असूच शकत नाही. याविरोधात आमचा लढा सुरूच राहील.”

हेही वाचा

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची हॉटेलांवर मोठी कारवाई; १० परवाने निलंबित

“लोकशाही आणि संसदेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लढा सुरू” : शशी थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही जयराम रमेश यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन करत केंद्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत थरूर म्हणाले की, “हो, नक्कीच लढा सुरू झाला आहे. भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी, भारताची एकता जपण्यासाठी आणि आपल्या संसदेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठीचा हा लढा आहे. जय संविधान, जय हिंद.”

संसदेच्या या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बैठकांचा धडाका सुरू झाला असून, आगामी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group