Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

डिलिमीटेशन विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१५ होणार?

नवी दिल्ली | संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून महिला आरक्षण लागू करण्याच्या घटनादुरुस्ती विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे. या महत्त्वाच्या प्रस्तावानुसार देशातील सर्व राज्यांतील लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या जागांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या या मंजुरीमुळे आता मतदारसंघ पुनर्रचना राबवून लोकसभेसह सर्व राज्यांच्या विधानसभांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये हे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते; मात्र आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने सरकारला माघार घ्यावी लागली होती. आता नव्या स्वरूपात सरकार पुन्हा एकदा हे विधेयक मंजूर करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले आहे.

हेही वाचा

आठवणींचा सांगीतिक नजराणा! अमित कुमार साहू यांचा ‘यादों का तोहफा’ गझल अल्बम जागतिक स्तरावर प्रदर्शित

लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा कायदा प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य आहे. सर्व राज्यांत समान दराने ५० टक्के जागा वाढवल्यास, लोकसंख्येच्या आधारावर होणाऱ्या पुनर्रचनेमुळे निर्माण होणारा संभाव्य प्रादेशिक असमतोल आणि राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या वाट्याबाबतचे वाद टाळण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे मानले जात आहे.

३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशनात कसोटी

येत्या ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेच्या विशेष बैठका नियोजित असून, याच अधिवेशनात सरकारकडून हे घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला मित्रपक्षांसोबतच विरोधी पक्षांतील आणि इतर सदस्यांची मते जुळवण्याची मोठी कसोटी पार पाडावी लागणार आहे. या निर्णयामुळे आगामी काळात देशाच्या राजकारणात मोठी खलबते रंगण्याची चिन्हे आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group