‘बिग बॉस २०’चा ग्रँड प्रीमियर दणक्यात; घरात उतरले १६ स्पर्धक, यंदा २ लाइफलाइन्ससह नवा ट्विस्ट!

Bigg Boss 20 Contestants | छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या २० व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या पर्वात क्रीडा, अभिनय आणि डिजिटल विश्वातील अशा एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. हा खेळ कसा रंगणार आणि कोण बाजी मारणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या १९ वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच डिझायनर उमंग कुमार यांनी बिग बॉसचे घर उभारण्याची धुरा वर्षा जैन यांच्याकडे सोपवली आहे. तब्बल १० हजार चौरस फुटांच्या या भव्य घरात स्पर्धकांवर नजर ठेवण्यासाठी १०४ कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत. यंदा प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा ट्विस्ट असून स्पर्धकांना खेळात २ लाइफलाइन्स मिळतील; ज्यामुळे एलिमिनेट झाल्यानंतरही त्यांना पुनरागमनाची दुसरी संधी मिळू शकणार आहे. हा शो ‘कलर्स टीव्ही’सह ‘जिओ-हॉटस्टार’वर प्रेक्षकांना पाहता येईल.
हेही वाचा
दिल्ली दुर्घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद; ५ मजली इमारत कोसळून ६ ठार, १० गंभीर जखमी
‘बिग बॉस २०’ मधील १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी
यंदाच्या पर्वात मेरी कोम, कणिका मान, आसिफ खान, काझी तौकीर, ईशा रिखी, आम्रपाली दुबे, रोहेद खान, लव्ह गिल, YUNG DSA, ScoutOP, अरिश्फा खान, गुल्लू (कुशल तन्वर), अमन गांधी, उदिती सिंग, रिती तिवारी आणि माही विज यांनी स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे.




